बीड: जिल्ह्यातील इन्फंट इंडियाच्या आनंदवन प्रकल्पातील एचआयव्हीसह जगणारी इयत्ता पाचवीतील पाच मुले तालुक्यातील पाली येथील जिल्हा परिषद शाळेत गेली होती. मात्र त्यांना वर्गात बसु न देता वर्गाबाहेर काढून परत प्रकल्पावर आणून सोडून देण्यात आले. अशी तक्रार इन्फंटच्या प्रकल्प संचालकांनी केली आहे. तर शाळेत असा कोणताही प्रकार झाला नाही. इन्फंटचे शिक्षकच त्यांना घेऊन गेले असे मुख्याध्यापक व शालेय समितीच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे.
बीड तालुक्यात इन्फंट इंडिया प्रकल्पात एचआयव्हीसह जगणारे ६५ विद्यार्थी आहेत. या प्रकल्पाअंतर्गत शाळेत शिक्षक येत नसल्यामुळे बुधवारी पालीच्या जि.प. शाळेत या प्रकल्पातील पाचवीचे ५ विद्यार्थी पाठवीण्यात आले. वर्ग सुरू असतानाच काही जणांनी वर्गात येऊन आनंदवन प्रकल्पाचे विद्यार्थी कोण, अशी विचारणा करत. ‘तुम्ही कशाला या शाळेत आला, तुम्हाला तुमच्या प्रकल्पावर शाळा दिली आहे. तुम्ही त्याच ठिकाणी शिका’ असे म्हणून त्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले.
मुलांनी हा प्रकार प्रकल्प संचालक दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांना सांगितल्यानंतर त्यांनी मुलांना पुन्हा शाळेत आणले. मुख्याध्यापक कांतीराम लाड यांच्यासह शिक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. ‘आमच्या हातात काहीच नाही, आमचा नाइलाज आहे’ असे शिक्षकांनी सांगितले. तर इन्फंटचे शिक्षक जावेद हेच या मुलांना घेऊन प्रकल्पावर परत गेले, या मुलांना आम्ही हाकलले नाही असे शाळेचे मुख्याध्यापक कांतीलाल लाड यांनी सांगीतले. याप्रकरणी बारगजे यांनी बुधवारी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट, बातमीनंतर जलवाहिनीच्या कामाची रक्कम भरली
- ‘बाहेरचे फक्त बघे, ते सामील नसतात’; परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया
- ‘…त्यावेळी मुजोर ब्रिटिश सरकारलाही शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले होते’
- ‘आता पवार म्हणतील, “त्यांनी” विवाहित व्यक्तीशी लग्न केलंय, त्यामुळे चारित्र्याची चौकशी केली पाहिजे’
- शेतकरी आंदोलनावर सचिन-विराट, रोहितनंतर अनेक क्रिकेटपटूंची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

