मुंबई : पुन्हा एकदा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या संदर्भात रेणू शर्मा यांनी पोलिसांकडे देखील धाव घेतली होती. मात्र, यानंतर रेणू शर्मा यांनी मुंडेंवरील तक्रार मागे घेतली होती. तसे त्यांनी पोलिसांना लेखी लिहून दिलं आहे.
मुंडेंवरील हे विघ्न तळल्यानंतर मराठवाड्यात त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. कुठे जेसीबीने फुले उधळली जात आहेत, तर कुठे क्रेनने भले मोठे हार त्यांच्या गळ्यात घातले जात आहेत. धनंजय मुंडे देखील भावून झाल्याचं दिसून आलं. आता धंनजय मुंडे यांच्या अडचणी पुन्हा वाढणार असं दिसत आहे. धनंजय मुंडे यांचे संबंध असलेल्या करुणा शर्मा यांनीच आता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
करुणा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहेत. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील टीकास्त्र सोडलं आहे. ‘लाज असेल तर आता तरी राजीनामा द्या…’ असा प्रहार त्यांनी केला आहे. याआधी देखील भाजपने नैतिकतेचं भान राखून मुंडेंनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली होती. ‘शरद पवार आता म्हणतील तक्रारदार महिलेने आधीच विवाहित असलेल्या माणसासोबत लग्न केलं आहे, त्यामुळे तिच्याच चारित्र्याची चौकशी केली पाहिजे,’ असा आरोप त्यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया देताना केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट, बातमीनंतर जलवाहिनीच्या कामाची रक्कम भरली
- ‘बाहेरचे फक्त बघे, ते सामील नसतात’; परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया
- ‘…त्यावेळी मुजोर ब्रिटिश सरकारलाही शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले होते’
- अर्णब गोस्वामींसह त्यांच्या पत्नीवर मुंबई पोलिसांकडून खटला दाखल
- …मग नेमकं महाराष्ट्र सरकार करतंय तरी काय ? राज्यपालांचा महाविकास आघाडीवर निशाणा


