Share

‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट, बातमीनंतर जलवाहिनीच्या कामाची रक्कम भरली

Published On: 

औरंगाबाद : जीबीपीआर कंपनीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मंजुर करण्यात आलेल्या 1680 कोटी रुपयांच्या जलयोजनेचे काम घेतले आहेत. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आलेल्या कामाचे उद्घाटन होऊन दिड महिना होऊन गेला तरी, ठेकेदाराने अनामत रक्कम भरली नसल्याने त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला नव्हता. दोन दिवसांपूर्वी ठेकेदाराने अनामत रक्कम भरली असून गुरुवारी त्यास कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र देशाने याबाबत ‘पाणीपुरवठा योजनेचा नुसताच बोभाटा, अद्यापही कार्यारंभ आदेशच नाही’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन मनपाने कामाची अनामत रक्कम भरल्याचे जाहीर केले.

वाचा

पाणीपुरवठा योजनेचा नुसताच बोभाटा, अद्यापही कार्यारंभ आदेशच नाही

दीड वर्षांपासून जलवाहिनी योजना मंजूर असूनही त्यास निधी नसल्याने योजना मार्गी लागू शकली नाही. गेल्या महिन्यात आठ डिसेंबर रोजी योजनेच्या खर्चास मंजुरी मिळाली. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. त्यावर दिड महिना उलटून गेला तरी, योजनेचे काम पुढे जात नव्हते. त्याची माहिती घेतली असता ठेकेदाराने त्यांना द्यावी लागणारी अनामत रक्कम भरली नसल्याने कार्यांरभ आदेश दिला नव्हता.

गेल्या आठवड्यात पालकमंत्री सुभाष देसाई, एमजेपीचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या प्रतिनिधीची संयुक्त बैठक मुंबईत पार पडली. त्यावेळी वाढीव रक्कम 300 कोटी रुपये देण्याची मागणी ठेकेदाराने केली होती. त्यावर वाढीव रक्कम मिळणार नसून तत्काळ अनामत रक्कम भरण्याचे आदेश ठेकेदारास दिले होते. दोन दिवसांपूर्वीच ठेकेदाराने अनामत रक्कम भरल्याने त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!