Share

शेतकरी आंदोलनावर सचिन-विराट, रोहितनंतर अनेक क्रिकेटपटूंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी ट्वीट केल्यानंतर #IndiaTogether हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे.

कर्णधार विराट कोहली म्हणाला, या कठीण प्रसंगी आपण एकजूटीने राहण्याची गरज आहे. शेतकरी आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण घटक असून या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. तोपर्यंत आपण शांतता राखणे गरजेचे आहे.

रोहित शर्माने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, जेव्हा आपण एकजुटीने उभे असतो तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची कायम महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू. एकजूटीने कोणत्याही समस्येवर तोडगा निघतो. त्यामुळे एकजूटीने राहू आणि आपले अंतर्गत प्रश्न सोडवू.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!