Share

‘बाहेरचे फक्त बघे, ते सामील नसतात’; परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विट केले की, “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्य शक्ती फक्त बघ्याची भूमिका असते, ते सहभागी नसतात. भारतीयांना भारत माहिती आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजुटीने उभे राहूया.”

याबरोबरच माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत आपले अंतर्गत विषय शांततेने सोडविण्यास सक्षम आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या ट्विटवर लिहिले की, कोणताही प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही. आपण एकजूट होऊन प्रगतीच्या दिशेने जाऊ. कोणताही प्रचार भारताला उंचीवर जाण्यापासून रोखू शकत नाही.

दरम्यान, या प्रकरणावर बहुतांश परदेशी सेलिब्रिटींनी भाष्य केले आहे. पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. अडल्ट स्टार मिया खलिफानेही या विषयावर ट्विट केले आहे. याशिवाय अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनीही शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!