Share

‘…त्यावेळी मुजोर ब्रिटिश सरकारलाही शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले होते’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन हे दोन महिने उलटून देखील सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये कृषी कायद्याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये या आंदोलनामुळे परिस्थिती अधिक चिघळत आहे. तर, विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सुरु ठेवलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशनात देखील या आंदोलनाचे पडसाद उमटत असून केंद्र सरकारने हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याच दरम्यान, राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंग्रज काळातील एका अदनपालांचा दाखल दिला आहे.

मुजोर ब्रिटीश सरकारलाही शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले असल्याचे सांगत शेतकऱ्यांमध्ये किती ताकद असते याची मोदी सरकारला आठवण करुन दिली आहे. गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘१९०० ते १९०६ दरम्यान ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतात तीन कायदे लागू करण्यात आले होते. पंजाब लँड वसाहत अधिनियम१९००, अधिनियम १९०६ आणि वसाहती अधिनियम १९०६ या तीन कायद्यांमध्ये जमीनीची मालकी ब्रिटीश सरकारकडे येणार होती. यामुळे शेतकरी आपल्या अधिकारापासून वंचित राहणार होते.’

‘यामुळे १९०७ मध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आणि त्यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व सरकार अजितसिंग, (सरदार भगतसिंग यांचे मोठे बंधू) किशनसिंग जी, (भगतसिंग यांचे वडील) करत होते. यावेळी “पगड़ी संभाल जटा पगड़ी संभाल… सारे जग दा पेट भरे तूं, अन्नदाता कहलाए तूं..” हे गाणं गाजलं होतं. यामुळेच शेतकरी अधिक संघटित झाले व आंदोलन उभे राहिले होते.’

‘यानंतर सरकारने त्या विधेयकात दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला आणि काही सुधारणा केल्या. मात्र, गुजरांवाला, लाहोर आणि इतरत्र जोरदार आंदोलन झाले. त्यानंतर तिन्ही बिले ब्रिटिश सरकारला परत घ्यावी लागली.’ अशी आठवण त्यांनी करून देत एकप्रकारे मोदी सरकारला इशाराच दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!