Share

सानियाच्या ‘त्या’ पोस्टमुळे शोएब मलिकने अर्धवट सोडला बांगलादेश दौरा

Published On: 

🕒 1 min read

दुबई: भारतीय टेनिस स्टारपटू सानिया मिर्झाचा (sania mirza)पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik)याने बांगलादेश दौरा अर्धवट सोडून दुबईला प्रस्थान केले आहे. सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकत आपल्या मुलाच्या आजाराबद्दल सांगितले आणि त्या क्षणीच शोएबने दौरा सोडत आपल्या कुटुंबीयाकडे प्रस्थान केले.

आता त्याच्या जागी शाहनवाज डहनीला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शोएब मलिक बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी -२० मध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. पीसीबीने जारी केलेल्या निवेदनानुसार शोएब मलिक आपल्या मुलाच्या आजारपणामुळे काल झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी -२० सामन्याला मुकला आहे.

शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झाने रविवारी संध्याकाळी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने आपल्या मुलाच्या आजाराबद्दल सांगितले होते. सानियाने या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘जेव्हा तुमचा मुलगा आजारी असतो आणि फक्त दोन तासांच्या झोपेनंतर तुम्ही काम करत असता.आणि या पोस्टनंतर शोएब मलिकने आपला बांगलादेश दौरा रद्द केला. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामने होणार आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी चितगाव येथे (शुक्रवारपासून) तर दुसरी कसोटी ढाका येथे ४ ते ८ डिसेंबररोजी खेळली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!