मुंबई: भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (gautam gambhir)आणि इरफान पठाण (irfan pathan)यांनी अजिंक्य रहाणेवर (ajinkya rahane)निशाणा साधला आहे. रहाणे हा खूप नशीबवान(lucky)आहे की त्याला आतापर्यंत संघात राहण्याची संधी मिळत आहे आणि त्याचवेळी संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही मिळत आहे, असे गंभीरने आपले मत व्यक्त केले आहे.
तर दुसरीकडे इरफान पठाणला विश्वास आहे की या कसोटी मालिकेतील सर्वांच्या नजरा नक्कीच अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर असतील आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करावीच लागेल. रहाणे गेल्या एक वर्षापासून खराब फॉर्मशी झुंजत असल्याचे इरफान पठाणने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने फारशा धावा केल्या नाहीत. रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेही त्यांच्या फलंदाजीमुळे गेल्या काही काळापासून टीकेचे धनी ठरत असल्याचे मत इरफान पठाण याने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना केले आहे. तर गंभीरने इंग्लंडच्या मालिकेत त्याची जशी कामगिरी होती त्यावरुनही तो संघात राहणे ही मोठी गोष्ट आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी (test match )सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत विराट कोहली (virat kohali )खेळत नसल्यामुळे रहाणे संघाचे नेतृत्व करत आहे. तर दुसरी कसोटी मुंबईत खेळवली जाणार असून कसोटी कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे. रहाणेच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल आणि तो आणखी चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे, असेही इरफान म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एसटी संपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी चर्चा करणार’
- ‘गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?’
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

