उत्तर प्रदेश : सोमवारी(२२ नोव्हें.) गोरखपूर भागातील चंपा देवी पार्क येथील बुथ अध्यक्षांच्या अधिवेशनाला संबोधित करत असतांना विधान भाजपाचे प्रमुख जेपी नड्डा यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही शेतकरी नेत्यापेक्षा अधिक काम केले आहे’, असे वक्तव्य केले. तसेच, विरोधी पक्षावर निशाणा साधत त्यांनी, त्यांचा लोकशाहीवर नव्हे तर कौटुंबिक राजवटीवर विश्वास आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की,’आम्ही सांस्कृतिक राष्ट्रवादासोबत आणि ते ‘वंशवाद’ सोबत पुढे जात आहेत. आमच्यासाठी राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी ‘वंशवाद’ हेच सर्वस्व आहे.’ तसेच अनेक लोक शेतकर्यांचे नेते बनतात, पण शेतकर्यांसाठी जर कुणी काही केले असेल तर ते मोदी आहेत. पंतप्रधानांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर भाजपावर टीका होत असताना नड्डा यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.
दरम्यान, पुढे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत नड्डा म्हणाले की,’भाजपा ‘सबका साथ, सबका विश्वास’ हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वांना सोबत घेऊन जात असताना, विरोधक मतपेटीचे राजकारण करतात आणि केवळ ‘विशेष समाज आणि कुटुंबाची’ चिंता करतात.आम्ही प्रत्येकाच्या प्रगतीचा विचार करतो आणि ते त्यांच्या भावाचा आणि काकाचा विचार करतात. आता त्यांनी काकांबद्दलही विचार करणे सोडून दिले आहे’, असेही नड्डा म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे- नारायण राणे
- ‘राज्य सरकार पाडण्यासाठी धक्के देत राहणार’, नारायण राणेंचा इशारा
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

