Share

…याला तुम्ही काय नाव देणार? सचिनने केला ‘तो’ व्हिडिओ पोस्ट

Published On: 

मुंबई: माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने(Sachin tendulkar) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काही मुलं क्रिकेट खेळत आहेत. या व्हिडीओत एक मुलगी फलंदाजी करत आहे, एक मुलगा गोलंदाजी (bowling)करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यष्टीरक्षणाला कुणी माणूस नाही तर चक्क एक कुत्रा उभा आहे. या कुत्र्याची क्रिकेटमधील चपळाई पाहून सचिनही अवाक झाला आहे.

सचिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘मला हा व्हिडीओ (video)एका मित्राने पाठवला आहे. हा व्हिडीओ पाहून हे काही चेंडू पकडण्याची तीक्ष्ण कौशल्य आहेत.आपण यष्टीरक्षण, क्षेत्ररक्षक आणि अष्टपैलू खेळाडू पाहिलेत. पण याला आपण काय नाव देऊ? असा सवाल करणारे ट्वीट (tweet )सचिन तेंडूलकरने केले आहे.

या व्हिडीओत एक लहान मुलगा गोलंदाजी करताना आणि मुलगी फलंदाजी करताना दिसत आहे. मुलगा पहिला चेंडू टाकतो आणि तो मुलीच्या बॅटला न लागता मागे जात असतो. तेवढ्यात एक कुत्रा येऊन तो चेंडू तोंडात पकडतो आणि तो चेंडू गोलंदाजी करणाऱ्या मुलाकडे नेऊन देतो. यानंतर हा कुत्रा अगदी माणसाप्रमाणे पुन्हा यष्टीरक्षकाच्या जागेवर येऊन चेंडू अडवण्यासाठी उभा राहतो. गोलंदाज दुसरा चेंडू टाकतो आणि फलंदाज मुलगी हा चेंडू समोर टोलवते. हे पाहून हा कुत्रा तात्काळ क्षेत्ररक्षण करण्यासाठी समोर पळतो आणि चेंडू पकडून गोलंदाज मुलाकडे देतो. पुढचा चौथा चेंडू मुलीला मारता येत नाही. तो तिच्या शरीराला लागून खाली पडतो. यानंतर हा कुत्रा समोर जाऊन तो बॉल पकडतो आणि गोलंदाज मुलाकडे देतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघून सचिनही आवक झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!