Share

अश्विन गोलंदाजीत मधल्या टप्प्यातील आक्रमक पर्याय- रोहित शर्मा

Published On: 

कोलकाता : आंतरराष्ट्रीय टी -२० सामन्यादरम्यान जेव्हा कधी मधल्या षटकांमध्ये बळींची गरज भासते , तेव्हा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन कायम आक्रमक पर्याय ठरतो, असे मत भारताचा टी -२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे.

न्यूझीलंडला तीन मालिकेत ३-० असा क्लीन स्विप दिल्यानंतर रोहितने गोलंदाजांच्या कामगिरीला सकारात्मक बदल म्हटले . यंदाच्या टी -२० विश्वचषक स्पर्धेद्वारे तब्बल चार वर्षांनी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन अश्विनने केलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत प्रभावी कामगिरी केली. त्याने मधल्या षटकांमध्ये धावांवर अंकुश लावतानाच बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत संघात सकारात्मक आणि आनंदी वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. खेळाडूंनी मोकळेपणे खेळावे यासाठी त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. संघाच्या पहिल्याच बैठकीत आम्ही खेळाडूंना सांगितले होते की, जर संघासाठी तुम्ही काही करत असाल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष केले जाणार नाही. जेव्हा तुमच्याकडे अश्विनसारखा गोलंदाज असतो, तेव्हा तुम्हाला मधल्या षटकांमध्ये बळी घेण्याची संधी मिळते. अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!