Share

‘राज्य सरकार पाडण्यासाठी धक्के देत राहणार’, नारायण राणेंचा इशारा

Published On: 

सावंतवाडी : काल(२२ नोव्हें.) पत्रकार परिषदेत बोलत असतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी राज्यसरकार पाडण्यासाठी भाजपाचे नेते आणि मी धक्के देत राहणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच सावंतवाडी विधानसभा मतदार संघात स्थानिक उमेदवारीला उमेदवारी दिली जाईल, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की,’सत्ताधारी शिवसेनेमुळे एसटीचा संप आहे. त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा तर काँग्रेस मागे आहे. चाळीस एसटी कामगार मृत्यू झाले आहेत. तरी लक्ष दिले जात नाही. परंतु आमचा पाठिंबा हा कामगारांना आहे. भाजपाचे विरोधी पक्षनेते एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपामध्ये कोणी गद्दारी करणार नाही. गद्दारी केली तर अद्दल घडवली जाईल. हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे पुढील काळात सर्वत्र भाजपमय वातावरण होणार आहे. सावंतवाडी व कुडाळ आमदार आणि खासदार सुद्धा भाजपचा असणार आहे. कोरोनामुळे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग बंद झाले आहेत किंवा कसे? याबाबत एजन्सी नेमून अहवाल मागविण्यात आला आहे. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय लघु मध्यम उद्योग विभागामार्फत क्रीडा महोत्सव भरवला जाईल. तसेच भारताचा ७५ वा अमृतमहोत्सव देखील जिल्ह्यात सेलिब्रेट केला जाईल.’

दरम्यान, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, महेश सारंग, अजय गोंदावळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!