Share

T20 World Cup | टी 20 विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी शोएब अख्तरने इंग्लंडला दिला स्पष्ट इशारा, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: रविवारी 13 नोव्हेंबर 2022 रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयसीसी (ICC) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) चा अंतिम सामना  पार पडणार आहे. या अंतिम सामन्यांमध्ये इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakisthan) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी दुसऱ्या विजेतेपदावर दोन्ही संघाची नजर आहे. कारण पाकिस्तान संघाने 2019 मध्ये जेतेपद पटकावले होते. तर, एका वर्षानंतर लगेचच इंग्लंडने ट्रॉफी जिंकली होती. अशा परिस्थितीत या सामन्याचा विजायवर कोणत्या संघाच्या नावावर कोरले जाईल याची सर्वांना आतुरता लागली आहे.

टी 20 विश्वचषक 2023 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाचा प्रवास अगदी नाट्यमय ठरला आहे. कारण या स्पर्धेच्या सुपर बाराच्या टप्प्यातून पाकिस्तान संघ जवळपास बाद होणार होता. तर दुसरीकडे संघाने अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेऱ्यांमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाचे माजी गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस म्हणजेच शोएब अख्तर यांनी पाकिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या आहे. त्याचबरोबर त्यांनी इंग्लंड संघाला एक इशारा देखील दिला आहे.

दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडने भारताला दहा गडी राखून पराभूत केले. इंग्लंडच्या जोस बटलर आणि अलेक्स हेल्स या दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडला जेतेपदाकडे नेले. इंग्लंडने भारतासारख्या बलाढ्य संघाला हरवले आहे. पण पाकिस्तान ला हरवणे इतके सोपे नाही, असे म्हणत शोएब अख्तरने इंग्लंडला इशारा दिला आहे. त्याचबरोबर तो म्हणाला की, ” इंग्लंडने भारतीय संघाला हरवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास गगनात मावेनासा झाला आहे. पण पाकिस्तान संघाचे गोलंदाज भारतासारखे नाही हे इंग्लंडला माहीतच आहे. त्यामुळे इंग्लंडला जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागेल.”

तर, दुसरीकडे शोएब अख्तरने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, ” पाकिस्तान संघाकडे आज हरायला काहीच नाही पण जिंकायला बरेच काही आहे. आज या सामन्यांमध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांचा फॉर्म दिसायला हवा. इंग्लंड सोबत झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये या दोघांचा वाढलेला स्ट्राईक रेट संघाचे बळ मोठे करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!