🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई : भाजप (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही, तर ते जनतेचं काय ऐकणार असं म्हणत त्यांनी टीकेचा बाण सोडला. अनेक आमदारांनी, खासदारांनीही एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि भाजपसोबत त्यांनी राज्यात सरकार स्थापन केलं. यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहे.
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझा पक्ष काँग्रेससोबत जाणार नाही. जायची वेळ आलीच तर पक्ष बंद करून टाकेन. हे उद्धव ठाकरेंनी ऐकलं का? जी व्यक्ती स्वत:च्या स्वर्गीय संस्थापक अध्यक्षांचं ऐकत नाही, स्वत:च्या वडिलांचं ऐकत नाही, ती व्यक्ती मुंबईच्या गोरगरिबांचं काय ऐकणार आहे?, असा घणाघात राम कदम यांनी केला आहे.
शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. मात्र, किर्तीकरांच्या या पक्षप्रवेशात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. कारण, गजानन किर्तीकर यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे कंपनीचा सर्वेसर्वा कोण? आदित्य ठाकरेंचं पोरगं . बाकीच्यांनी टीळा लावायचा, हाती झेंडा घ्यायचा आणि उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणायचं बाकी काही नाही, असं देखील राम कदम म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Khadse | “हिंमत असेल तर कारनामे बाहेर काढा”, एकनाथ खडसेंचं महाजनांना आव्हान
- Bhaskar jadhav | “शिंदे गटातील आमदार जास्त काळ…”, म्हणत ईडी वर देखील भास्कर जाधवांचा घणाघात
- Eknath Shinde | “आम्ही ५० नाही तर २०० खोके देतो, मात्र…”, शिंदेंचा खुलासा
- Supriya Sule | “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश…”, ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प हातून गेल्याने सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- Jitendra Awhad | “राज ठाकरे यांनी माफी मागावी…”, जितेंद्र आव्हाडांचा पत्रकार परिषदेतून घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

