🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे. MPSC यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. MPSC यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळू शकतात.
MPSC यांच्यामार्फत विविध पदांच्या जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या 623 जागा भरण्यासाठी ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ राज्यसेवा (पूर्व) परीक्षा 2022 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. MPSC च्या या पदांसाठी पदांनुसार पत्रकार उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
या पदांमध्ये उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी आणि सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी इत्यादी पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MPSC यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी, पदानुसार पत्रधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
महत्त्वाच्या तारखा
MPSC मार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 14 नोव्हेंबर 2022 पासून ते 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. तर, सदर परीक्षा दिनांक 21,22 आणि 23 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही…”, भाजप आमदाराचा घणाघात
- Eknath Khadse | “हिंमत असेल तर कारनामे बाहेर काढा”, एकनाथ खडसेंचं महाजनांना आव्हान
- Bhaskar jadhav | “शिंदे गटातील आमदार जास्त काळ…”, म्हणत ईडी वर देखील भास्कर जाधवांचा घणाघात
- Eknath Shinde | “आम्ही ५० नाही तर २०० खोके देतो, मात्र…”, शिंदेंचा खुलासा
- Supriya Sule | “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश…”, ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प हातून गेल्याने सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

