🕒 1 min read
Deepali Sayyed | मुंबई : दिपाली सय्यद यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना एकत्र आणणार असून त्यांची बैठक आयोजित करणार असल्याची घोषणा दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी केली होती. मात्र आता त्यांनीच एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, दिपाली सय्यद यांना शिंदे गटात घेण्यासाठी भाजपच्या महिला आघाडीने विरोध दर्शवला आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी हा विरोध केला आहे.
महाविकास आघाडीच्या काळात दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली होती. त्यामुळे त्यांनी मोदी आणि भाजपची जाहीर माफी मागावी, तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा, असं भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे (Mrunal Pendse) यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांचा आदर करतात. पण कोणतीही विचारधारा नसणारी, आपली मते सातत्याने बदलणारी, तसेच कुठली पात्रता नसलेल्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी वाचली. महाविकास आघाडीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत दिपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिपाली सय्यद यांना आमचा विरोध असल्याचं मृणाल पेंडसे म्हणाल्या.
दरम्यान, भाजपा महिला मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी दिपाली मोकाशी (Deepali Mokashi) यांनीही यासंदर्भात भाष्य केलंय. दिपाली सय्यद यांनी आधी भाजपाची बिनशर्त माफी मागावी, खोट्या तक्रारी मागे घ्याव्यात, त्यानंतरच त्यांना शिंदे गटात प्रवेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही…”, भाजप आमदाराचा घणाघात
- Eknath Khadse | “हिंमत असेल तर कारनामे बाहेर काढा”, एकनाथ खडसेंचं महाजनांना आव्हान
- Bhaskar jadhav | “शिंदे गटातील आमदार जास्त काळ…”, म्हणत ईडी वर देखील भास्कर जाधवांचा घणाघात
- Eknath Shinde | “आम्ही ५० नाही तर २०० खोके देतो, मात्र…”, शिंदेंचा खुलासा
- Supriya Sule | “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश…”, ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प हातून गेल्याने सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
