दिंडोरी: दिंडोरी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे प्रभारी सभापती नरहरी झिरवाळ आणि राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष एकनाथ शेटे यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ आहे. दिंडोरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत मात्र स्थानिक वर्चस्ववादाच्या लढाईत यंदा दोन्ही काँग्रेस, शिवसेना व भाजप या चारही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता.
माजी नगराध्यक्ष देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सुत्रे होती. त्यात शिवसेनेची भाजपशी छुपी युती असल्याची चर्चा पसरली होती. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात शिवसेना नेते रामदास चारोस्कर यांचा मुलगा तुषार याचा भाजपच्या आशा कराटे (Asha Karate) यांनी एक मताने पराभव केला. पराभव जरी झाला असला तरी येथे सर्वाधिक मतं ही शिवसेनेलाच मिळाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या दिंडोरीत यंदा सर्व पक्षांनी स्वतंत्र उमेदवारी केली. त्यात महाविकास आघाडी म्हणून बहुमतही मिळाले. शिवसेनेला सर्वाधीक सहा जागा मिळाल्या मात्र, शिवसेनेचे नेते माजी आमदार रामदास चारोस्करक (Ramdas Charoskar) यांचे पुत्र तुषार चारोस्कर (Tushar Charoskar) यांचा एक मताने झालेला पराभव शिवसेनेला चांगलाच जिव्हारी लागला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बीडमध्ये भाजपच्या विजयानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे…
देवगड नगरपंचायत निवडणूकीत नितेश राणेंना मोठा धक्का; भाजपने गमावली सत्ता!
“हे आर आर आबांचं रक्त!”, अजित पवारांचा रोहित पाटलांवर कौतुकाचा वर्षाव; सुप्रिया सुळे भावूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

