Share

बीडमध्ये भाजपच्या विजयानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे…

Published On: 

बीड: बीड जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं वर्चस्व दिसून आलं. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींवर भाजपा आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी वर्चस्व मिळवत भाजपाचा (BJP) झेंडा फडकवला आहे.

केजमध्ये राज्यसभा खासदार रजनी पाटील (MP Rajani Patil) यांना पराभव पत्करावा लागला. त्याठिकाणी राष्ट्रवादी (NCP), शेकाप आणि स्थानिक आघाडीने सत्ता काबीज केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे (Bajarang Sonavane) यांच्या मुलीला पराभव स्वीकारावा लागला आहे.

जिल्ह्यात मुंडे बहीण भावात रंगलेल्या सत्तासंघर्षात पंकजा मुंडे यांनी आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे. भाजपच्या विजयानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हीत. एका मतदारसंघाचं नेतृत्व आणि जिल्ह्याचं पालकत्व यात फरक आहे. लोकांचा गेल्या अडीच वर्षातील कामकाजाचा राग आणि आमच्या काळातील कामकाजाची पावती असा तो निकाल आहे. बीडमधील लोकांनी भविष्यात काय चित्र असेल हे दाखवलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!