मुंबई: आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मात्र यावर विरोधकांनी सडकून टीका करायला सुरुवात केली आहे.
देशाला मजबूत आर्थिक धोरण पाहिजे आहेत, जुमलेबाजी नको, असे म्हणत कॉंग्रेस पक्षाने (Congress) बजेट सादर होण्यापूर्वीच टीका करायला सुरुवात केली आहे. त्याच राज्याच्या महिला व बालकल्याणविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी देखील तीव्र शब्दात टीका केली आहे, पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प, अशा शब्दात त्यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
आता शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी देखील या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अत्यंत निराशाजनक असे हे अर्थसंकल्प असल्याचे राऊत म्हणाले आहेत. पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले, ५ मिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे,देशाला प्रगतीपथावर नेण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ठेवले होते. या संदर्भात कोणताही उल्लेख या बजेटमध्ये झाला नाही. त्यामुळे या बजेटमध्ये देशवासीयांची फसवणूक झाली आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
नितेश राणेंना मोठा धक्का; सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
“माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?”, दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर उत्तरला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

