Share

“गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही”, अर्थसंकल्पावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. मात्र यावरच “मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन,( Balasaheb Thorat allegation of presenting the budget ahead of elections) या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेली आहे. सर्व वर्गाची घोर निराशा करणारा दिशाहीन व अर्थहीन संकल्प आहे”, अशी टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे.

गेल्या सत्तर वर्षात उभे केलेले विकण्याचे काम मोदी सरकार करत आहे. सरकारी कंपन्या विकणे, टॅक्स आणि इंधनाचे दर वाढविणे यापलीकडे केंद्र सरकारकडे दुसरे काही धोरण नाही. सरकारी पैशांतून व्यवस्था उभ्या करायच्या आणि पुन्हा त्या विकायच्या हेच, मागील सात वर्षात सुरु असून तेच भविष्यातही सुरु राहणार आहे, यावर आजच्या अर्थसंकल्पातून शिक्कामोर्तब केले आहे. असा घणाघातही बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

आज देशातील बेरोजगारीने सर्वाच्च उच्चांक गाठला आहे. तरूणांना रोजगार देण्याबाबत कोणताही ठोस रोडमॅप न तयार करता केवळ घोषणा करायची म्हणून ६० लाख नोकऱ्या देण्याची घोषणा करून बेरोजगार आणि तरुण मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न आज करण्यात आला आहे. थोडक्यात मोदी सरकारने आपल्या स्वभावाप्रमाणे केलेला हा अर्थसंकल्प आहे, जो पूर्ण करण्यासाठी ते बांधील नाहीत. अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!