बुलढाणा : शनिवारी बुलढाण्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये मोठा राडा झाला असल्याचं पाहायला मिळालं. चक्क हा सगळा प्रकार पोलिसांसमोरच झाला असल्याचं समजतं आहे. या प्रकारावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना पक्षातील नेत्यांना चांगलंच धमकावलं आहे.
संजय गायकवाड यांचे वक्तव्य-
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल, तर चून चून के, गिन गन के मारे मायेंगे, असं म्हणत संजय गायकवाड यांनी शिवसेना नेत्यांना ठणकावलं आहे. संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा-
बुलढाण्यामध्ये शनिवारी ठाकरे गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी आमच्या नेत्यांवर टीका का करता?, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. त्याठिकाणी कुणाल गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि खासदार प्रतापराव जाधव या दोघंही गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांवरील जबाबदारी काढून घेत त्यांच्याजागी बुलढाण्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक केली होती. त्यामुळे बुलढाणामधील राजकीय वातावरण तापलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | ‘टार्गेट’ असणे गैर नाही पण जनतेच्या…; फडणवीसांची शिवसेनेवर टीका
- Bhaskar Jadhav | “मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल”
- Narendra Modi | “अर्ध्या तासात नरेंद्र मोदी यांचा फोटो लावा”; …अन् अर्थमंत्री चांगल्याच भडकल्या
- Ajit Pawar | “राज कपूर आधी शोमॅन म्हणून ओळखला जायचा, आता…”, भर कार्यक्रमात अजित पवार यांची टोलेबाजी
- Sharad Pawar | शिंदे-ठाकरे वादात शरद पवार यांची उडी?, सबुरीचा सल्ला देत म्हणतात, ‘डोन्ट फाईट…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

