Share

‘गोवाचं ‘कॅरेक्टर’ सुधरवायचं असेल तर…’; संजय राऊतांचे वक्तव्यं

Published On: 

मुंबई: गोवा येथील विधानसभा निवडणूक (Goa Elections) तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेना १८ आणि १९ तारखेला गोव्यात पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते सकाळी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे तसेच तृणमूल आणि आप पक्षावर देखील टीका केली आहे.

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी बद्दल बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही. त्यासाठी आमचे प्रयत्न होते. पण, ते अयशस्वी ठरले. पण, गोव्यात फक्त १०-१२ लोक राजकारण करतात. तेच भूमाफिया आहेत. सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेले लोक देखील ड्रग्स माफिया आहे, असा आरोप देखील संजय राऊतांनी केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, गोव्यातील (Goa) राजकारण प्रस्थापितांच्या हातात गेलंय. भ्रष्टाचारी, ड्रग्स माफियांच्या हातात गोव्याचं सुत्र आहे. ते मोडीत काढायचं असेल आणि गोव्याचे ‘कॅरेक्टर’ सुधरवायचे असेल तर गोवेकरांनी सामान्य माणसाला निवडून आणायला पाहिजे. गोव्यात हे होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!