मुंबई : भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जबरदस्त टोला लगावला असून सुधीर मुनगंटीवारांचे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील असं राऊत यांनी म्हटलं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील तीन महिन्यात सरकार येईल असं म्हटलं होत. त्यावर संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘चांगला विनोद करतात लवकरच महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरु होत आहेत. मला आता काही प्रमुख नाट्य निर्मित्याचा फोन आला आहे .त्यांना काही सूट हवी आहे. मला काही गरज वाटत नाही, सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
त्याचबरोबर सरकार पुढील तीन वर्ष मजबुतीने काम करेल. सुधीर मुनगंटीवार किंवा भाजपाने त्याबाबत चिंता करु नये. उत्तम विरोधी पक्षाची भूमिका ते निभावत असून त्यांनी त्यात कायम राहावं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, ‘कधी कधी खलनायकसुद्धा सिनेमा पुढे घेऊन जातो. नायकासोबत खलनायक सुद्धा ताकदीचा लागतो. आम्ही जेव्हा सिनेमा पाहायचो तेव्हा प्राण, शक्ती कपूर, अमरीश पुरी, निळू फूले, राजशेखर असे अनेक होते. त्यांच्यावर सुद्ध सिनेमा चालत असे. महाआघाडी असल्याने हा महासिनेमा आहे. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासारखे कलाकार असतात. त्यांनी आपली भूमिका उत्तम वठवली आहे. पुढील साडे तीन वर्ष या राज्यातील वातावरण खेळीमेळीचं आणि हसतमुख राहील’ अस राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो, फडणवीस त्यांचे पात्र उत्तम वठवत आहेत’
- आ.नमिता मुंदडा यांच्या सासऱ्यांना पोलीस निरीक्षकांकडून अवमानकारक वागणूक
- अधिवेशनात गायब राहून मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले हा सवाल विचारण्याची हिम्मत राऊत दाखवतील का?
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- ‘भूतिया वेडिंग ऑफ द इअर,’ पाहा जान्हवीचा व्हिडिओ


