Share

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणुकांची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा होत आहे. याचबरोबर निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील जोरदार तयारी केली जात आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील निवडणूक रॅलीत भाजपावर निशाणा साधला.

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करत होत्या त्यावेळी हे शाब्दिक युद्ध पाहायला मिळाल. तर यावेळी नंदीग्राममध्ये भाजपने ‘तुम्ही आम्हाला परक्या आहात,’ अशी पोस्टर्स लावली आहेत. या प्रकारामुळे तृणमूलचे कार्यकर्ते संतापले आहेत. असे असताना ममता बनर्जी यांना दुखापत झाल्याने हे कारस्थान भाजपचे लोक करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. काही समाजकंटकांनी कारचा दरवाजा ढकलला त्यामुळे त्यांच्या पायाला जखम झाल्याने त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले.

नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ममता बनर्जी एका मंदिरात गेल्या आणि तेथून बाहेर आल्यावर त्या कारजवळ उभ्या होत्या. तिथे थांबून त्या कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या कारमध्ये बसत असताना दरवाजा आतील बाजूस ढकलला आणि यातच त्यांच्या पायाला दुखापत झाली. या प्रकारानंतर त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले.

या संदर्भात  अभिषेक बनेर्जी यांनी ममतांचा दवाखान्यातील फोटो ट्वीट करत भाजपला निवडणुकीच्या दिवशी  बंगालची ताकद पाहण्यासाठी तयार राहा असे आव्हान दिले आहे.  ‘भाजपा 4 बेंगल रविवारी, 2 मे रोजी बेंगलच्या लोकांची शक्ती पहाण्यासाठी स्वत: ला तयार  करा.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!