Share

‘सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो, फडणवीस त्यांचे पात्र उत्तम वठवत आहेत’

Published On: 

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा २०२४ पर्यंत नक्की चालेल. भाजपने पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षाची भूमिका आतासारखीच उत्तमपणे पार पाडत राहावी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकासआघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील सरकार पडणार, या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्रातील सरकारचं २०२४ नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडावी. सरकार एवढ्या दिवसांत किंवा महिन्यात पडेल, ही धमकी देणं बंद करावं. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात भाजपने विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केले. खरं खोटं नंतर बघू, पण पुढची साडेतीन वर्ष विरोधी पक्ष म्हणून असंच काम करत राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्राचा नंबर आहे, असा सूचक इशारा देणारे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. तीन महिन्यांत सरकार पडेल, हा सुधीरभाऊंचा विनोद चांगला होता. राज्यातील प्रमुख नाट्यनिर्माते आम्हाला फोन करतात. काही सवलत देण्याची मागणी करतात. मात्र, त्याची काही गरज नाही. सुधीर मुनगंटीवार यांचे विनोदी कार्यक्रम ठेवले तर तुफान गर्दी होईल, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

‘सामना’त अग्रलेख लिहला गेला म्हणजे घाव वर्मी बसला, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस सामना वाचतात ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना जगात काय सुरु आहे, हे कळेल. देवेंद्रजींनी सामना वाचायची सवय लागली असेल तर कौतुक आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!