Share

‘भूतिया वेडिंग ऑफ द इअर,’ पाहा जान्हवीचा व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : निर्माते दिग्दर्शक बोनी कपुर व श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने आपल्या नवीन चित्रपटातील आपला लूक शेअर केला आहे. नेहमी ग्लॅमरस अवतारात दिसणारी जान्हवी मात्र या चित्रपटात चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा लुक पाहुन प्रेक्षकांचा थरकाप उडल्या शिवाय राहणार नाही.

दिनेश विजन यांच्या ‘रुही’ या नविन चित्रपटात जान्हवी चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. दिनेश विजन यांनी याआधी ‘स्त्री’ हा हॉरर चित्रपट बनवला होता. ‘स्त्री’ चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता राजकुमार राव हा या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रुही हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शीत होणार आहे. ‘रूही’ची कहाणी ही एका चेटकिणीची आहे. या चेटकीणीची नजर लग्न सोहळा असलेल्या घरांवर आहे. लग्नानंतर नवरदेव झोपला की, ही चेटकीण नववधूला आपल्याबरोबर घेऊन जाते.

https://www.instagram.com/p/CMMxsBKA8DQ/

चित्रपट प्रदर्शनाआधी जान्हवीने या सिनेमातील तिचा ‘भूत लूक’ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये जान्हवीशिवाय राजकुमार राव आणि वरूण शर्मा दिसतात. व्हिडीओच्या सुरुवातीला राजकुमार दिसतो, मग वरूण शर्मा आणि यानंतर जान्हवी. नववधूच्या वेशात आरशासमोर तयार होत असलेली ही जान्हवी पाहून अंगाचा क्षणभर थरकाप उडतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!