Share

आ.नमिता मुंदडा यांच्या सासऱ्यांना पोलीस निरीक्षकांकडून अवमानकारक वागणूक

Published On: 

बीड : एका प्रकरणात अंबाजोगाई शहर ठाण्यात गेलेले ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी अवमानकारक वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी संतप्त झालेल्या नंदकिशोर मुंदडा यांनी बुधवारी सायंकाळी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या दिला. नंदकिशोर मुंदडा हे केज-अंबाजोगाई मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे आहेत.

मिळालेल्या माहितीनूसार, नंदकिशोर मुंदडा हे शहर ठाण्यात बुधवारी काही महिला व नागरिकांसह पोलीस निरीक्षकांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी पोलीस निरीक्षक पवार हे ठाण्यात नव्हते. मुंदडा आल्याचे कळाल्यावर ते ठाण्यात आले. परंतु ‘तुम्ही विना परवानगी माझ्या कक्षात कसे बसले’ असे म्हणत त्यांनी मुंदडा यांच्याशी अरेरावीची भाषा वापरत कक्षाबाहेर काढले.

यावेळी मुंदडा यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पवार ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या मुंदडांनी कार्यकर्त्यांसमवेत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. यानंतर ठाण्यात समर्थकांची गर्दी वाढली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अपर अधीक्षक स्वाती भोर यांनी रात्री शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. नंदकिशोर मुंदडा यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!