Share

अधिवेशनात गायब राहून मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले हा सवाल विचारण्याची हिम्मत राऊत दाखवतील का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत अनेक मुद्द्यांवर सरकारची नाचक्की झाल्याचे देखील पाहायला मिळाले. यानंतर आज सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे विरोधी पक्षाला कधी कळणार? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे.

संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला जास्त जबाबदारीने वागावे लागते, पण महाराष्ट्रात विरोधी पक्षाला अशा जबाबदारीची जाणीव फारशी दिसत नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवट झाला, पण सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले? असा सवाल सामना मधून करण्यात आला आहे.

वस्तुस्थिती पाहिली तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा पुरेपूर वापर करून या अधिवेशनात जो हल्ला चढवला त्यामुळे सत्ताधारी नेते मंडळी अक्षरशः घायाळ झाल्याचे दिसून आले आहे. विरोधकांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणापर्यंत पुराव्यासहित केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी हतबल झाल्याचे दिसून आले.

सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांना हे अधिवेशन आयुष्यभर लक्षात राहील असे हे अधिवेशन झाले आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी सरकारची एवढी पीछेहाट झाली की संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अधिवेशनात फडणवीस यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला. गृहमंत्री,मुख्यमंत्री यांना देखील या हल्ल्याचा प्रतिकार करता आला नाही. या प्रकरणात ठाकरे सरकारची प्रचंड नाचक्की झाली होती. ठाकरे सरकार आणि गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं.

कोविड सेंटरमधील महिलांवरील अत्याचार, कोरोना काळात झालेला मोठा भ्रष्टाचार,पीकविमा,वीजबिलाचा प्रश्न,शेतकऱ्यांच्या समस्या,विदर्भ मराठवाड्याच्या समस्या,राज्यातील कायदा-सुव्यवस्था या मुद्यांवर विरोधकांनी सत्ताधारी मंडळींना धारेवर धरलं हे सामानाचे संपादकीय लिहणारे संजय राऊत यांना का दिसले नाही हे एक कोडे आहे. सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले? असा सवाल उपस्थित करणारे संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील उपस्थिती बाबत चकार शब्द देखील काढत नाहीत.

गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांवर अधिवेशन काळात विरोधी पक्ष जोरदार हल्ले चढवत असताना ते एकाकी पडल्याचे चित्र पाहायला मिळत होते.अशा वेळी मुख्यमंत्री सभागृहात पूर्णवेळ उपस्थित असणे अपेक्षित असताना गायब राहून मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले हा सवाल विचारण्याची हिम्मत राऊत दाखवतील का हा खरा सवाल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!