पुणे- तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तीनशेहून अधिक एसयुव्ही वाहनांचा ताफा पुण्याला घेऊन गेल्यानंतर गॅंगस्टर गजानन मारणेची राज्यभर चर्चा झाली. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे, गर्दी जमवणे असे आरोप त्याच्यावर झाले. त्या प्रकरणात त्याला जामीन मिळाला मात्र जमीन मिळताच गजानन मारणे फरार झाला.
गजा मारणे याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही शेकडो चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती.या घटनेचे व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांसह पुणे पोलिसांनी देखील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गजा मारणेवर गंभीर गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान,यानंतर परवा सातारा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.मेढा पोलिसांनी पाठलाग करुन गजा मारणेला जेरबंद केलं. जावळी-महाबळेश्वर भागात गजा मारणे असल्याचा सुगावा लागताच मेढा पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.गजा मारणे याला शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी अगदी फिल्मी स्टाईलने पकडलं.
दरम्यान, न्यायालयाने गुंड गजा मारणे याच्या सहा साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला. यासंदर्भात, आरोपींनी आणखी कुठे दहशत निर्माण केली आहे का?, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्यांना अटक होणे गरजेचे आहे. यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला होता. त्यांचा युक्तीवाद मान्य करीत न्यायालयाने गजा मारणे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा हा अर्ज फेटाळला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तारेवरची कसरत लीलया पूर्ण करत अर्थमंत्री अजित पवारांनी दुसरा अर्थसंकल्प मांडला’
- पैठण-औरंगाबाद रस्त्यावर दुचाकीचा अपघात, महिला दिनीच महिलेचा बळी
- ‘अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे हे तसे जिकिरीचेच काम होते’
- ‘हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा अर्थसंकल्प’
- … म्हणून गज्या मारणेने अटकेनंतर चक्क मेढा पोलिसांना ठोकला सलाम


