मुंबई : झी मराठी वाहिनी वरील ‘अग्गंबाई’ सासूबाई’ या मालिकेचे कथानक आता नवीन वळण घेत आहे. तसेच या मालिकेचे शीर्षकदेखील ‘अग्गंबाई सूनबाई’ असे बदलण्यात आलेले आहे. मालिकेच्या नविन कथानकात अभिनेत्री निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या मालिकेतील तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे शुभ्रा आणि बबड्या उर्फ सोहमच्या भूमिकेत दिसणार नाहीयेत.
या दोघांची जागा उमा पेंढारकर आणि अद्वैत दादरकर हे घेणार आहे. अभिनेता आशुतोष पत्की हा मालिकेचा आणि प्रेक्षकांचा निरोप घेताना भावूक होत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्ट मध्ये तो म्हणतो की, ” ‘सोहम’ ऊर्फ ‘बबड्या’ काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर हे पात्र कायम १ नंबर वर असेल माझ्यासाठी, कारण ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका मला खुप मोठी शिकवण देऊन गेली. मालिकेतील सगळ्या दिग्गज कलाकारांच्या सहवासात खूप शिकलो. झी मराठी वाहिनी आणि निर्माते या दोघांचे ‘सोहम’ म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी मी त्यांचा नेहमीच ऋूणी राहील.
https://www.instagram.com/p/CMIA0xtJBTm/
पुढे आशुतोष म्हणतो, ‘हे पर्व संपताना सगळा प्रवास आठवतोय. खूप आठवण येईल पण “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” लवकरच एक नवीन चेहरा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन.’ ‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये अभिनेता आशुतोष पत्कीने सोहम उर्फ बबड्याची व्यक्तीरेखा कमालीची लोकप्रिय ठरली होती. पण आता आशुतोषच्या जागी अद्वैत दादरकर ही भूमिका साकारणार आहे. येत्या १५ मार्चपासून मालिकेचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- … म्हणून गज्या मारणेने अटकेनंतर चक्क मेढा पोलिसांना ठोकला सलाम
- आमदार राजेंद्र राऊतांना धमकावणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करा : फडणवीस
- अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण ?
- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील वापरतात इलेक्ट्रिक कार !
- देवदत्त पड्डिकलचा धडाका सुरुच; सलग चौथ्या सामन्यात शतक


