मुंबई : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला आहे. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आलाय. इतकंच नाही तर राणेंचा मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. मराठा समाजातील चेहरा, तसेच शिवसेना-भाजपची युती तुटल्यामुळे मुंबईसह कोकणातील येत्या स्थानिक निवडणूका बघता राणेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
राणेंचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. त्याकाळात शिवसेना आणि भाजपची युती देखील होती. मात्र, आता शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर राणे हे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेबाबत सातत्याने आक्रमक टीका करत असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे एकप्रकारे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने नारायण राणे यांच्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे का ? अशी चर्चा सुरु आहेत.
यावर आता शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘भाजपने त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. बघुया ते काय करतात. हा शह वगैरे काही नाही. कोण कुणाला अंगावर घेतं ते बघा तुम्ही. कोकण आणि शिवसेना हे नेहमीच समीकरण राहिलं आहे. त्यामुळे कोकणचे लोक आणि शिवसेनेते कधीही अंतर पडणार नाही’, असा घणाघात अनिल देसाई यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तू आणि मी! निसर्गाच्या कुशीत ईशांत शर्माचा पत्नीसह रोमान्स ; पाहा व्हिडिओ
- वयोवृद्ध व्यक्तीने गाडीचं दार उघडल्याने कियारा आडवाणी होतेयं ट्रोल
- सुनील बर्वेच्या लेकीचा परफॉर्मन्स पाहून, कलाकार झाले भावूक
- पृथ्वी शॉच्या इंग्लंड दौऱ्यावर BCCIचं स्पष्टीकरण
- धोनीच्या चाहत्यांकडून गंभीर होतोयं ट्रोल ; ‘ती’ कृती पडली महागात


