Share

धोनीच्या चाहत्यांकडून गंभीर होतोयं ट्रोल ; ‘ती’ कृती पडली महागात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल ७ जुलै करोडो भारतीयांचा लाडका क्रिकेटपटु महेंद्रसिंह धोनीचा वाढदिवस होता. धोनीच्या फॅन्ससाठी कालचा दिवस म्हणजे एक उत्सवच. देशभरातुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यादरम्यान धोनीचा सहकारी आणि भारताचा माजी ओपनर गौतम गंभीर धोनीच्या वाढदिवसादिवशी धोनीच्या चाहत्यांकडून ट्रोल झाला. झाले असे की, गंभीरने धोनीच्या वाढदिवशीच फेसबूकवर आपला कव्हर फोटो बदलला आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

गंभीरने बुधवारी फेसबूकवर आपला कव्हर फोटो म्हणून 2011 वर्ल्ड कप फायनलचा फोटो ठेवला. या फोटोमध्ये गंभीर स्वत:ची बॅट दाखवत आहे. या फोटोमधून 2011 वर्ल्ड कप जिंकवण्यात धोनीशिवाय आपलंही योगदान आहे, असं गंभीरला सुचवायचं आहे, असं चाहत्यांना वाटलं. एका चाहत्याने तर गंभीरवर करत लिहिले, ‘धोनीची सगळ्यात मोठी खासीयत हीच आहे, की तो शांत राहतो. निवृत्तीनंतरही तो अशा लोकांकडे लक्ष देत नाही, जे त्याच्याविरुद्ध काम करत आहेत,’ असं एक चाहता म्हणाला.

धोनी आणि गौतम गंभीर यांच्यात वाद असल्याच बोललं जातं. गंभीरनेही अनेकवेळा 2011 वर्ल्ड कपचा विजय फक्त धोनीमुळे मिळाला नाही, असं बोलून दाखवलं आहे. चाहते आणि मीडिया 2011 वर्ल्ड कप विजयाचं श्रेय धोनीच्या अखेरच्या सिक्सला देतात. पण याच सामन्यात गौतम गंभीरने 97 रनची महत्त्वाची खेळी केली होती. वर्ल्ड कप विजयात युवराज, झहीरसह संपूर्ण टीमचा हात होता, फक्त धोनीचा नाही, असं वक्तव्य गंभीरने एका मुलाखतीदरम्यान केलं होत.

२०११चा विश्वचषक हा भारतीयासाठी २८ वर्षापासुन अपुर्ण राहिलेले स्वप्न होते. या स्पर्धेत भारतीय संघाने उत्तम कामगीरी करत अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारतीय संघासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ३१ धावांवर भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी तंबुत परतले होते. यावेळी संपुर्ण स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा युवराज सिंग पुन्हा भारताला विजयी करुन देईल अशी अपेक्षा क्रिकेट रसिक करत होते. मात्र युवराजच्या जागी धोनी स्वत: चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरला. संपुर्ण स्पर्धेत धोनीने १५० धावा केल्या होत्या. मात्र सगळ्या स्पर्धेची कसर त्याने अंतिम सामन्यात पुर्ण केली. अंतिम सामन्यात ११ चेंडुत ४ धावांची गरज असताना धोनीने मारेलला तो षटकार लाखो भारतीयांच्या मनावर कोरला गेला. यासंह टी-२० विश्वचषकासह एकदिवसीय विश्वचषक धोनीच्या खात्यात जमा झाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!