इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
इंग्लंड संघासोबतच्या कसोटी मालिकेसाठी बराच वेळ शिल्लक असल्यामुळे भारतीय संघ आता तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असेल 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याअगोदर तीन आठवड्यांचा आराम घेऊन खेळाडू 14 जुलै रोजी सरावासाठी परत एकत्र येतील.
https://www.instagram.com/reel/CQ82vNNA8yR/?utm_source=ig_web_copy_link
या सुट्टीत खेळाडू कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा त्याच्या पत्नीसह भटकंती करताना दिसला तर पत्नीसोबत ईशांत शर्मा घेतोय सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. इशांत शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. इंस्टग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत इशांत शर्मा आणि पत्नी निसर्गात धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहे. दोघेजण अगदी मनोसोक्त या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का ; ‘या’ स्टार खेळाडूची माघार
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी


