मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या यशाच्या शिखरावर आहे. अनेक बड्या अभिनेत्यासोबत तिने काम केले आहे. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने अनेकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. कियाराच्या अभिनयाची आणि तिच्या बोल्ड फोटोशूटची अनेकदा चर्चा देखील होत असते. मात्र सध्या तिला एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले आहे.
कियाराचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी संताप व्युक्त केला आहे. कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी गेली होती. यावेळी तिला स्पॉट करण्यात आलं असून या व्हिडीओमुळे ती ट्रोल झाली आहे.
https://www.instagram.com/p/CQ_zmKxFpJa/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कियारा गाडीतून उतरताना दिसतेय. मात्र त्यापूर्वी एक वयोवृद्ध गार्ड कियाराच्या गाडीचं दार उडघून तिला सलाम करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कियारा ला सुनावले आहे. ‘कियारा गाडीचं दार देखील स्वत: उघडू शकत नाही का?’ असा सवाल करत कियाराला ट्रोल करण्यात आलंय. कियारा आडवाणी लवकरच ‘भूल भुलैया 2’, ‘शेरशाह’, ‘जुग जुग जियो’ आणि ‘मिस्टर लेले’ या चित्रपटात झळकणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का ; ‘या’ स्टार खेळाडूची माघार
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी


