मुंबई : अभिनेता सुनील बर्वे यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात त्याने जागा निर्माण केली आहे. सध्या ते छोट्या पडद्यावरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. मात्र सोशल मीडियावर फार सक्रीय नसलेले सुनील बर्वे यांनी नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या व्हिडीओची सध्या चर्चा रंगली आहे.
https://www.instagram.com/reel/CQ8n64cJjKV/?utm_source=ig_embed&ig_rid=8a2456dc-41a4-4d17-a394-5693266a771c
सुनीव बर्वेने लेकीसोबतचा हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘तिच्या जन्मापासून मला या क्षणाची भीती वाटत होती.’ सुनील बर्वेची लेक सानिका हिच्या लग्नात परफॉर्म करतानाचा हा व्हिडिओ आहे. ज्यात सानिका ‘राजी’ सिनेमातील ‘दिलबरो’ या गाण्यावर वडिलांसोबत थिरकताना दिसते आहे आणि यावेळी ते दोघेहि इमोशनल झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान यावेळी तिथे उपस्थित असलेले सर्वच कलाकार देखील हा परफॉर्मन्स पाहून भावूक झाले. सुनिल बर्वे यांनी लेक सानिका बर्वेसोबतचा हा व्हिडिओ पोस्ट करत मुलीच्या लग्नातील आठवणींना उजाळा दिला आहे. प्रत्येक बापाला आपल्या मुलीची पाठवणी करताना काय वाटत असते ते या व्हिडिओतून दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का ; ‘या’ स्टार खेळाडूची माघार
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी


