इंग्लंड : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील दुखापतग्रस्त झाल्यामुळे आगामी कसोटी मालिकेतुन बाहेर पडला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात पृथ्वी शॉची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर चांगलाच वाद सुरु आहे.
हा वाद शिगेला पोहोचला असताना निवड समिती आणि भारतीय संघात दरम्यान सुरु असलेला वाद चव्हाट्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांची मागणी केली असल्याचं समोर आलं. शुभमन गीलची दुखापत समोर आल्यानंतर संघ व्यवस्थापनाने इंग्लंड दौऱ्यासाठी दोन खेळाडुंची मागणी केली होती.
सध्या टीमकडे केएल राहुल आणि मयंक अग्रवाल पर्याय म्हणून उपलब्ध आहेत पण संघ व्यवस्थापनाने पृथ्वी शॉ याला इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याची विनंती केली असल्याचे वृत्ती समोर आले होते ज्यावर आता एका बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिले. टीम इंडियाच्या मॅनजमेंटने शुभमन गिलऐवजी कोणत्याच खास खेळाडूची मागणी केली नव्हती. म्हणजेच टीमने पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांची कधीही मागणी केली नसल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का ; ‘या’ स्टार खेळाडूची माघार
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
