Share

“हे आर आर आबांचं रक्त!”, अजित पवारांचा रोहित पाटलांवर कौतुकाचा वर्षाव; सुप्रिया सुळे भावूक

Published On: 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पाटलांचे विशेष कौतुक केले आहे.

अजित पवार म्हणाले, “ज्या ज्या भागामध्ये तरुण नेतृत्व आहे. लोक त्यांच्यावर विश्वास टाकतात. कर्जतला मागच्या पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडूण आले नाहीत. आज तिथे रोहित पवार नेतृत्व करत आहेत त्याने एकहाती सत्ता आणली आहे. तिच गोष्ट रोहित पाटलांच्या संदर्भात आहे. सगळे एकीकडे आणि एकटा रोहित एकीकडे होता. तरी देखील रोहितने सत्ता मिळवली. रोहितचं वक्तृत्व चांगल आहे. त्याच्या कामाची पद्धत चांगली आहे. आर आर पाटलांच रक्त रोहित मध्ये आहे. मनमिळावू स्वभाव असल्यामुळे, सर्वांशी तो आपलेपणाने वागत असल्यामुळे लोकांनी त्याच्यावर विश्वास टाकला आहे.”

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्यासाठी ही भावनिक परिस्थिती होती. कारण आर आर आबांना जावून एवढे वर्ष झाले. तरी माझ्या आयुष्यात आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमात तसेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आबा आजही आहेत. एक आदर्श नेतृत्व महाराष्ट्रचा आपल्याला अभिमान वाटेल, असा पुत्र खूप लवकर आपण गमावला. आज रोहित ज्या पद्धतीने लढला आहे. हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!