औरंगाबाद: जालना जिल्ह्यातील घनसावंगी, तीर्थापुरी, जाफ्राबाद, मंठा आणि बदनापूर नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांच्यामुळेच हा मतदारसंघ काबीज करण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. घनसावंगीत राष्ट्रवादीने १० तर तीर्थपुरी नगरपंचायतीत ११ जागा मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे.
घनसावंगी आणि तीर्थपुरी मतदारसंघाशिवाय बदनापूर, मंठा, जाफ्राबाद मतदारसंघात भाजप, शिवसेना, काँग्रेसने मताधिक्य मिळवले आहे. बदनापूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या ठिकाणी भाजपने ९, राष्ट्रवादीने ५ जागांवर विजय मिळविला आहे. याठिकाणी भाजपने ९ जागा मिळवण्यामागे आमदार नारायण कुचे यांचा हात आहे. मात्र शिवसेनेला याठिकाणी एकही जागा मिळाली नाही. शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या वर्चस्वाला भाजपने चांगला धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे.
तर मंठा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्वच्या सर्व १२ उमेदवार निवडून आले आहे. याठिकाणी भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री असलेले बबनराव लोणीकर यांना मोठा धक्का पचवावा लागत आहे. कारण मंठा नगरपंचायत आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात दिलेली आहे. तर जाफराबाद नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगले यश मिळवले आहे. याठिकाणी काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना चार तर भाजपने केवळ एका जागेवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीने देखील या ठिकाणी सहा जागा पटकावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

