Share

लारा दत्ताला आजही सलमान करतो मध्यरात्री फोन, काय आहे गुपित

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान (Salman Khan) चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. बऱ्याच अभिनेत्रींसोबत त्याचे नाव ही जोडलं जातं. आता नुकतचं अभिनेत्री लारा दत्ताने (Lara Dutta) सलमानबद्दल वक्तव्य केलं असून सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटातील लाराच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटामध्ये तिनं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तसेच लारानं हिकप्स अँड हूकप्सया सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. या सीरिजमध्ये प्रतीक बब्बर आणि शिनोवा यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता लाराने सलमानबद्दल वक्तव्य केलं आहे. काय आहे जाणून घेऊ या.

https://www.instagram.com/p/CYV9cDID7Oh/?utm_source=ig_web_copy_link

हिंदी चित्रपट पार्टनर (Partner), नो एँट्री यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेता सलमान खान आणि लारानं एकत्र काम केले आहे. ‘पार्टनर’ या चित्रपटातील लारा आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्याकाळी त्यांच्या जोडीबद्दल ही चर्चा होती. तसेच सलमान, अभिनेत्री लारा दत्ता हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. एका मुलाखतीमध्ये लारानं सलमान तिला मध्यरात्री फोन करतो, असं सांगितलं. मुलाखतीमध्ये लारानं सांगितलं की, सलमान रोज रात्री १२ वाजता उठतो.  दररोज मला तो मध्यरात्री फोन करतो आणि मी देखील एवढ्या रात्री त्याचा फोन रिसिव्ह करते.’ यामुळे त्या दोघांच्या घट्ट मैत्रीबद्दल ऐकूण चाहत्यांना देखील कौतूक वाटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!