सिंधुदुर्ग: सर्वांचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. देवगडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांचे पुत्र नितेश राणे(Nitesh Rane) यांचाच हा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. देवगड नगरपंचायत निवडणूकीत नितेश राणे यांच्या हातून सत्ता गेली आहे. या ठिकाणी आधी भाजपची सत्ता होती मात्र आता येथे शिवसेनेला ८ आणि भाजपला ८ अशा समान जागा मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात भंडारा आणि गोंदिया मधील २३ नगरपरिषदा व त्याअंतर्गत असलेल्या ४५ पंचायत समितीच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होऊ शकलेली नाही. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळाली. मात्र प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने देखील या ठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आपली कमाल दाखवू शकलेला नाही. याठिकाणी भाजपला ८ तर शिवसेनेला ८ अशा समान जागा मिळाल्या आहेत.
तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे याठिकाणी नेमकी सत्ता कोण स्थापन करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. तसेच आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या निकालात अनेक दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. राज्यातील १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. या सर्व ठिकाणी मतमोजणी सुरू असून अनेक ठिकाणी निकाल देखील जाहीर झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

