Share

शिवभोजन थाळी आता मोफत मिळणार नाही; १ ऑक्टोंबरपासून द्यावे लागणार ‘इतके’ पैसे

Published On: 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंधही शिथिल करण्यात येत आहेत. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळीही ३० सप्टेंबरपर्यंतच मिळणार आहे. त्यानंतर येत्या एक ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीचा दर पूर्ववत दहा रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, शिवभोजन थाळीचीही संख्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत होते. कोरोनामुळे लाभार्थ्यांना ही थाळी मोफत दिली जात होती. 30 सप्टेंबरपर्यंत थाळी मोफत असेल नंतर त्याचे दर 10 रुपये असे पूर्वीप्रमाणे करण्याचा शासनादेश आज जारी करण्यात आला आहे.

तसेच पार्सल सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक द चेन प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली होती. राज्यात ब्रेक द चेन अभियानांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केलं होतं. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण 950 केंद्र सुरू होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!