कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर, कोल्हापुरातील वातावरण तापलं असून सोमय्या यांना २० सप्टेंबर रोजी कोल्हापूरला न जाताच माघारी फिरायला लागलं होतं. तर अखेर आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.
दरम्यान आज किरीट सोमय्या यांनी ठरल्याप्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन किरीट सोमय्यांनी तक्रार दिली. हसन मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. त्याचीच तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या मुरगूड पोलिसात गेले.
यावेळी किरीट सोमय्या यांची तक्रार कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील यांनी स्वीकारली. राजाराम रामराव पाटील हे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. त्यांनीच आज हसन मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी दिलेली तक्रार स्वीकारली आहे.
ज्यावेळी किरीट सोमय्या हे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील यांना भेटले तेव्हा सोमय्यांनी आर आर आबा आणि त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबधांना उजाळा दिला असल्याची माहिती मिळत आहे. ‘आर आर आबा चांगले होते, सज्जन होते, सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यासारखे नव्हते, मला बऱ्याचदा सल्ला द्यायचे आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो,’ असं किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षक राजाराम पाटील यांना सांगितले असल्याची पण माहिती सध्या मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सोमय्यांच्या मागे आम्हीच हे फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी खुलेपणाने सांगावे’, सतेज पाटलांचे आव्हान
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून


