मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर तब्बल एक हजार कोटींच्या अब्रु नुकसानीचा दावा ठोकला आहे. मुंबै बँकेत कथित स्वरुपात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे सखोल चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. दरेकर हे या बँकेचे संचालक असल्याने त्यांच्यावरही आरोप झाले. त्यामुळेच अखेर दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा ठोकला आहे.
‘मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. या लौकिकाला काळिमा फासण्याचे काम वेगवेगळ्या टप्प्यावर मुंबई जिल्हा बँकेच्या संदर्भात झाले आहे. वैयक्तिक बदनामीबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. मात्र, ज्या वेळेला एखाद्या आर्थिक संस्थेची बदनामी होते, त्यावेळेला त्यांच्या डिपॉझिटरवर परिणाम होतो, ग्राहकांवर परिणाम होतो, त्याच्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचे पोट त्याच्यावर असते. उद्या जर एखाद्या बातमीने किंवा एखाद्या स्टेटमेंटने बँक अडचणीत आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, अशी थेट सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबै बँकेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकतंच राज्य सरकारच्या सहकार विभागाने सखोल चौकशीचे आदेश दिले. जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती सरकारकडून करण्यात आली. हेच नाही, तर चौकशीचा कालावधीही ठरवून देण्यात आला. अवघ्या तीन महिन्यांत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा निर्देश सहकार विभागाने दिला. या बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर आहेत. त्यामुळे दरेकरांना टार्गेट करण्यासाठीच चौकशी लावली गेल्याचा आरोप भाजपने केलाय.
दाव्याबाबत दरेकर म्हणाले की, ‘कालच याठिकाणी हायकोर्टामध्ये सूट नंबर २१९०९ आणि २१९३५ या नोंदणी क्रमांकाप्रमाणे त्या ठिकाणी दावा दाखल झालेला आहे. तशाप्रकारचं आता सर्कुलेशन होईल. आणि या मुंबई बँकेच्या बदनामीच्या संदर्भात कोर्टाच्या माध्यमातून जबाबदार लोकांवर कारवाईची आमची मागणी असेल.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून


