मुंबई : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेकांची पिके सध्या पाण्यातच आहे. लवकरात-लवकर शासनाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा धरण आज पूर्ण भरले. तसेच बीडमधील माजलगाव धरणाचे दरवाजे आज पुन्हा उघडण्यात आले आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यात सोयाबीन, कपासी आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करुन मदत देण्यासाठी केंद्राकडून ७ हजार कोटींची मागणी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘मराठवाडा, विदर्भातील महापुराची परिस्थिती पाहता सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. केवळ केंद्र सरकार मदत करत नाही अशी टीका करत फिरू नये, तर सरकारने आधी मदतीचा हात पुढे करावा, असा सल्ला त्यांनी दिला. शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे, असा चिमटाही मुनगंटीवार यांनी काढला.
दरम्यान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी मदत देण्यात येते ते नियम जुने आहेत. त्यामुळे त्यात बदल करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आमचे प्रयत्न आहे असेही वडेट्टीवार म्हणाले. पंतप्रधानांनी गुजरातला १ हजार कोटी दिले होते, त्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रातील नुकसान पाहता किमान ७ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे-नारायण राणे येणार एकाच मंचावर
- केवळ रजनी पाटीलचं नव्हे तर ‘या’ नेत्यांची देखील काल झाली राज्यसभेवर बिनविरोध निवड
- सोमय्या चार वाजता टाकणार राजकीय ‘बॉम्ब’; नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार ? चर्चांना उधाण
- सरकारचा सावळा गोंधळ सुरूच; एकाच दिवशी विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार दोन परीक्षा
- आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झालीये; सोमय्या पुन्हा कडाडले


