मुंबई : मनी लॉन्ड्रिंगप्रकरणीच्या आरोपावरून शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीनं चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे परब समर्थकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
अनिल परब यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आज सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. हे त्यांना ईडीचे दुसरे समन्स होते. अनिल परब ईडीच्या कार्यालयात हजर होण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ‘मी शिवसेनाप्रमुख आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो मी चुकीचं काही केलं नाही’ असे परब म्हणाले होते.
सकाळी काय म्हणाले अनिल परब?
मला आज ईडीचं दुसरं समन्स मिळालेलं आहे आमि मी चौकशीला आज जात आहे. मी शिवसेनाप्रमुखांची आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन मागे सांगितलं आहे की मी कुठलंही चुकीचं काम केलंलं नाहीये. त्यामुळे आज मी चौकशीसाठी सामोरं जात आहे. चौकशीत जे प्रश्न मला विचारले जातील त्याची उत्तरं दिली जातील आणि चौकशीत पूर्णपणे सहकार्य करणार. चौकशीला नेमकं का बोलवलं आहे याचं कारण अद्याप मला माहिती नाही. चौकशीला सामोरं गेल्यावर अधिकृतपणे कळेल. माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाहीये.
दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. सचिन वाझे गृहविभागातील बदल्यांच्या संदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला होता. तसेच सचिन वाझे याने दिलेल्या आपल्या कथित स्टेटमेंटमध्ये अनिल परब यांच्यावर आरोप करत म्हटलं होतं की, बदल्या थांबवण्यासाठी अनिल परब यांना २० कोटी रुपये मिळाले होते. त्या अनुशंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचे समजते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळे करण्याच्या विविध कला ठाकरे आणि पवारांनी निर्माण केल्यात’
- आर आर पाटलांच्या सख्ख्या भावाकडे सोमय्यांनी केली हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार
- ‘मुंबै बँकेच्या बदनामीवरून उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा दावा’, प्रवीण दरेकरांची माहिती
- ‘सोमय्यांच्या मागे आम्हीच हे फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी खुलेपणाने सांगावे’, सतेज पाटलांचे आव्हान
- ‘शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे’, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला चिमटा


