Share

Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र नवीन हातात जाणार?; रोहित पवारांचे सूचक विधान

Published On: 

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवार हे जुन्नर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले कि, “२०२४ नंतरची वेळ ही युवकांची असेल. तेव्हाचे निर्णय नवीन पिढी घेईल”, असं विधान त्यांनी केले होते. त्यावरूनच आता २०२४ नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात बदल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

या सभेत बोलताना रोहित पवार असेही म्हणाले कि, “आम्ही कायम जमिनीवरच राहणार आहोत. जमिनीवर राहण्याची मागच्या पिढीची शिकवण स्वीकारुन ती आत्मसात केली आहे. २०२४ नंतरची वेळ ही युवकांची असेल. आपले दिवस आले की निर्णय सुद्धा आपणच घेणार, त्या निर्णयांमध्ये आपल्याला शरद पवार आणि अजित पवार यांचं मार्गदर्शन असेलच, पण कोणतं पद कोणाला द्यायचं? आणि काम कसं करायचं?, याचे निर्णय मात्र नवीन पिढीला घ्यावे लागतील”. त्यांच्या याच विधानामुळे उलटसुलट चर्चा रंगू लागल्या. मात्र त्यांनी आता ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट केले कि, “मी कोणत्याही पक्षातील पदांबाबत बोललो नाही. पण लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमदार, खासदार, जि.प. सदस्य, नगरसेवक म्हणून युवांनी केवळ चांगल्या विचारांच्या लोकांनाच निवडून देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.शिवाय सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी त्या सरकारला युवांकडं दुर्लक्ष करता येणार नाही तर सशक्त युवा धोरण आखून ते राबवावं लागणार आहे. या माध्यमातून येणारा काळ आपला म्हणजेच लोकशाही विचारांचा आणि युवांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा असेल, यात शंका नाही.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!