Chandrakant Patil । कोल्हापुर : आज राज्याच्या राजकीय वर्तुळात एक दुःखद घटना घडली. भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली व त्यांचा परिवार आहे.
कोल्हापुरातील संभाजीनगर येथे त्यांचे निधन झाले असून त्या ९१ वर्षाच्या होत्या. चंद्रकांत पाटलांच्या आईच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. सरस्वती पाटील या कोल्हापुरातील त्यांच्या घरी वास्तव्यास होत्या.
वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खाली-वर होत होती, आज ती देवाघरी गेली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. पार्थिव देहावर आज (दि. २४) रात्री ८.३० वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र नवीन हातात जाणार?; रोहित पवारांचे सूचक विधान
- Eknath Shinde । अक्कलकोट बस अपघातातील जखमींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्हिडिओ कॉल वरून केली विचारपूस
- Ravi Rana : “शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार, अन् शिवसेना भवनही… ”, रवी राणा यांचं मोठं भाकीत
- Urfi Javed | उर्फी जावेदने घातला गुलाबाच्या पाकळ्यांचा ड्रेस; चाहते झाले घायाळ | पहा VIDEO
- Ravi Rana : “संजय राऊत हे शरद पवारांचे नंदी, उद्धव ठाकरेंचं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील”, रवी राणांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

