🕒 1 min read
MNS | मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाऊन राज्यात नवं शिंदे सरकार अस्तित्वात आलं. यावेळी शिवसेना पक्षाचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी उद्धव ठाकरे सोडून एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल. असा वेळी शिवसेना पक्ष पुर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यात भाजप, शिंदे गट यांच्यासोबतच मनसेने देखील शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरवात केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधलाय.
संदीप देशपांडे हे सतत शिवसेनेवर टीका करत असतात. ते टीकेची एकही संधी सोडत नाहीत. आपल्या ट्वीटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात, ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!’ यासोबत संदीप देशपांडेंनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटोही शेअर केलाय. महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे यांच्या फोटोसह संदीप देशपांडे यांनी केलेल्या या ट्वीटचे अनेक अर्थ आता राजकीय जाणकारांकडून काढले जात आहेत.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा pic.twitter.com/2QxhYD8OeR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2022
दरम्यान, शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरे हे बोलतात एक आणि करतात दुसरेच. यावरून ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक आमदार मिळूनही मुख्यमंत्री पदावर शिवसेनेने दावा केला होता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे निवडणुकीच्या प्रचारसभेत जाहीरपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. त्यावेळी उद्धव गप्प का बसले, असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक
- Mahesh tapase | तुम्ही नगरविकास मंत्री होता, तेव्हा मुंबई शहर खड्डे मुक्त का नाही केले? – महेश तपासे
- Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र नवीन हातात जाणार?; रोहित पवारांचे सूचक विधान
- Eknath Shinde । अक्कलकोट बस अपघातातील जखमींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्हिडिओ कॉल वरून केली विचारपूस
- Ravi Rana : “शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार, अन् शिवसेना भवनही… ”, रवी राणा यांचं मोठं भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
