Share

Mahesh tapase | तुम्ही नगरविकास मंत्री होता, तेव्हा मुंबई शहर खड्डे मुक्त का नाही केले? – महेश तपासे

Published On: 

मुंबई : येत्या २ वर्षामध्ये मुंबई शहरातले सर्व रस्ते खड्डे मुक्त करू अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास विभागाचे अडीच वर्ष मंत्री होते, तेव्हा का त्यांनी रस्ते खड्डे मुक्त केले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण नगरविकास विभागाचे अडीच वर्ष मंत्री होतात. राज्यातल्या सर्व नगरपालिका, महानगरपालिका हे सर्व आपल्या अधिपत्याखाली काम करत होते. त्या वेळेला मुंबई शहरातील रस्ते खड्डे मुक्त का नाही केले? हा प्रश्न मुंबईच्या नागरीकांच्या मनात निर्माण झालेला आहे. आज जेव्हा आपण अशा घोषणा करता, याचा अर्थ असा आहे की, आपण जेव्हा नगर विकास खात्याचे मंत्री होतात त्या कार्यकाळामध्ये मुंबईच्या विकासाठी तुम्ही काहीच केले नाही. ही त्याचीच कबुली आहे का?, अशी विचारणा महाराष्ट्रातली जनता करत आहेत”, असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!