🕒 1 min read
मुंबई : कर्नाटकमधील बंगळुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची गुरुवारी विटंबना झाली होती. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यावर शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind savant) यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे.
अरविंद सावंत म्हणाले, आम्ही सत्व आणि तत्त्व सोडलं नाही. आम्हाला आमच्या मूळ स्वभावावर यायला लावू नका, छत्रपती शिवाजी महाराज हे धगधगता अग्नी आहेत. त्यांचा अवमान झाल्यावर सर्वांचीच बोबडी वळली, असे अरविंद सावंत म्हणाले.
सावंत पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधानांनी काशीतील कार्यक्रमात शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. आधी बोम्मईंचा राजनीमा घ्या आणि मगच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असल्याचं दाखवा. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बोम्मईंच्या राजीनाम्याची मागणी करणारे घराघरातून पत्र जाऊ द्या. पेटून उठा हेच शिवसेनेने शिकवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
बोलतील एक आणि करतील दुसरेच असे हे भाजपचे लोक आहेत. केवळ राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव घेतात. मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षावर शाई फेकली. तिच शाई महाराजांवर फेकली. आता ही लोक दरवाजावर येतील. काळजी घ्या, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- “छत्रपतींसमोर नतमस्तक न होणाऱ्या मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवताय”
- राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादीकडून आज दुग्धाभिषेक
- “मोदींजींनी खरे शिवभक्त असल्याचे संपूर्ण देशाला दाखवून द्यावे, अन्यथा…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
